शेन वॉर्नच्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव: 5 कोटींना विकली गेली

Spread the love

महाराष्ट्र २४ सिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची ग्रीन टेस्ट कॅप (बॅगी ग्रीन) शुक्रवारी सुमारे 4.88 कोटी रुपये (१ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर) मध्ये विकली गेली. ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी तो ही रक्कम वापरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा एक तृतीयांश भाग आगीमुळे प्रभावित आहे. यात 30 लोक मरण पावले आहेत.

याबाबत ट्विट करत 50 वर्षीय शेन वॉर्न सांगतो, ज्यांनी या लिलावामध्ये भाग घेतला त्यांचे धन्यवाद. वॉर्नच्या कॅपसाठी बोली प्रक्रियेला 6 जानेवारीपासून सुरू झाली आणि 10 जानेवारीच्या सकाळपर्यंत चालली. त्या दिवशी काही तासांत या बोलीने 3 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा (सुमारे दीड कोटी रुपये) टप्पा पार केला होता. दरम्यान, अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही अग्निशमन दलाच्या जवानांना आगीविरूद्ध लढण्यास मदत करण्याची घोषणा केली. यंदा तिच्या पहिल्या स्पर्धेत तिने घातलेला ड्रेस लिलाव करणार आहे. त्याच वेळी फॉर्म्युला वन चॅम्पियन लुई हॅमिल्टनने 3.55 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *