महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि.३ जानेवारी – सावित्रीबाई फुले यांच्या 178 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ,समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांपत्य होय. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यास आपले सारे आयुष्य पणाला लावले. समाजातील स्त्री दास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असे ठाम मत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिंयापुढे मांडले. शैक्षणिक क्षेत्रात मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दांपत्याचा समारंभपूर्वक सत्कार केला. जोतीरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या त्त्तवांचा अंगिकार करून त्यासाठी सावित्रीबाईंनी आपले सारं जीवन व्यतित केलं. अशा सामाजिक कार्य कराणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या 178 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत सद्य परिस्थितीत तमाम महिलांनी अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी सावित्रीमाईंच्या विचारांच्या पाऊल वाटेवरून मार्गक्रमण करण्याचा संदेशही आमदार बनसोडे यांनी यावेळी दिला.
स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची 178 वी जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येत आहे. अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दांपत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून तत्कालिन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली असेल तर ती फुले दांपत्याने. बालविवाहाला विरोध करून ते थंबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिंमतीने पार पाडले. विधवांचा पुनर्विवाह मान्यता मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली. आणि या सामाजिक कार्यात फुले दांपत्यांना यश मिळाले. व त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.