महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि.३ जानेवारी – युवा वर्गात ह्दयविकाराचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. एम्स सहीत देशातील पन्नास केंद्रामध्ये केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे.तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना हार्टअॅटक येऊन मृत्यू झाल्याचे या पाहणीत आढळले आहे. युवकांना तंबाखूमुळे हार्टअॅटक येऊन मृत्यू झाल्याचे प्रमाण चाळीस टक्के आहे. तबांखूच्या व्यसनापासून युवा वर्ग लांब गेला नाही तर येणाऱ्या दिवसात याचा धोका अधिक वाढू शकतो, असे एम्सच्या अहवालात म्हटले आहे. एम्सच्या ह्दयरोग विभागाचे प्रा. डॅा. नीतीश नायक म्हणाले की 20 ते 30 वयोगटातील युवकांना ह्दयविकारामुळे रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
युवकांमधील वाढत चालेल्या ह्दयविकाराबाबत एम्सने देशातील पन्नास केंद्रात पाहणी केली आहे. यात तंबाखूचे सेवन हे या आजाराचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. ह्दयविकार असलेल्या 35 टक्के रूग्ण हे पन्नास वर्षांच्या आतील आहेत. तर दहा टक्के रूग्ण हे तिशीच्या आतील आहेत.
एम्स के कार्डियोलॉजी विभाग के प्रोफेसर डॉ. अंबुज राय म्हणाले की ह्दयविकाराने पीडित अनेक युवकांना तंबाखुचे व्यसन आहे. तंबाखूमुळे रक्तवाहीन्यांमध्ये जास्त ब्लॉकेज होत नाही, रक्तवाहीन्या ठिक असतात. पण तंबाखुमुळे रक्त गोठून जाते. ताण- तणाव, फास्ट फुडमुळेही ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे.