देशातील सर्व नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस ; केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – भारतात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आजपासून ड्राय रन सुरू होत असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोनाची लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं मेगा प्लॅन तयार केला आहे. आजपासून ड्राय रन देखील केलं जात असतानाच कोरोना लशीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

देशात पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना मिळेल निःशुल्क लस इतर 27 कोटी लोकांबद्दल सरकार घेणार लवकरच निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा देखील घेतला आहे. त्यादरम्यान हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली आहे.

नववर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca Covishield Vaccine) लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे.

Bharat Biotech आणि फायझर लशीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच संदर्भात आज आरोग्य मंत्रालय, कोरोना लशीसंदर्भातील तज्ज्ञांची दुपारी बैठक होणार आहे आणि यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय़ आज येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *