महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पि.के. महाजन – दि.३ जानेवारी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले स्मारक पिंपरी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला शासकीय ” महीला शिक्षक दिन ” साजरा करण्या त आला. दिनांक 2 व 3जानेवारी रोजी समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. दोन जाने. रोजी सावित्रीमाई फुले स्मारक पिंपरी येथे सकाळी सावित्रीमाई फुलें च्या पुतळयास माननीय महापौर ढोरे यांच्या हस्ते, उपमहापौर श्री.घोळवे, पक्षनेते श्री. ढाके व स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. रक्त दान शिबिरात महिलांनी उत्साहा ने सहभाग घेवून रक्तदान ही केले. तीन जाने. रोजी सकाळी आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुलें महिलांच्या साठी शिक्षण सुरू केल्यामुळे महीला सुशिक्षित झाल्या व आपल्या कर्तृत्वावर ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच, नगरसेविका, महापौर, आमदार खासदार मंत्री ते सर्वोच्च पद राष्ट्रपती पर्यंत पोहोचल्या….हि सर्व सावित्रीमाई फुलें ची देण आहे असे गौरवोद्गगार आमदारांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
तद्नंतर सन्माननीय शारदाताई ताई मुंढे यांनी ” होय मि सावित्रीमाई फुले बोलतेय ” हे एकपात्री नाटक सादर केले. मोठ्या उत्साहाने महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शहरातील सामाजिक संघटना ….सावित्रीबाई फुले स्मारक समिती , अखील भारतीय महात्मा फुले समता परीषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच शहरातील बहुसंख्येने महीला व नागरीकांची उपस्थिती होती.