दादा ( सौरभ गांगुली ) यांची प्रकृती स्थिर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -पि.के.महाजन.- दि. ४ जानेवारी -बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया तीन रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याचे शनिवारी निदान करण्यात आले होते. त्यापैकी एका नलिकेत स्टेंट आत सरकवून हे अडथळे काढण्यात आले आहेत. ‘कालची रात्र त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली असली तरी आता त्यांना ताप नाही. ते आता व्यवस्थित निद्रा घेत आहेत,’ असे हॉस्पिटलने दिलेल्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब 110/70 आणि ऑक्सिजनचे प्रमाण 98 टक्के असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांची स्थिती पाहून त्यांच्यावर आणखी एकदा अँजिओप्लास्टी करायची का, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने, त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याच्या पर्यायाबाबत विचार केला नसल्याचे सांगितले. ‘त्यांच्यावर पुढील उपचार करण्याबाबत तज्ञ पॅनेल निर्णय घेणार आहे. त्यांनी आज सकाळी नाष्टा घेतला, वर्तमानपत्र वाचले आणि हॉस्पिटलमधील स्टाफबरोबर बातचीतही केली,’ असे त्यांच्यावर उपचार करणाऱया एका डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, गांगुली यांच्या तब्बेतीचे वृत्त समजताच त्यांचे माजी सहकारी, विद्यमान खेळाडू, राजकीय नेत्यांनी लवकर बरे होण्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *