महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India) यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील (Border-Gavskar Trophy)तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवदीप सैनीने (Navdeep Saini) या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं आहे.
पावसाच्या विश्रांती नंतर सामना सुरु झाला , पण कांगारूंची सुरवात खराब झाली . सिराज ने डेव्हिड वॉर्नर ला माघारी पाठवले. ऑस्ट्रेलिया च्या ३१ वर १ बाद असा धावफलक आहे.