शेतकरी आंदोलन ; तिन्ही कायद्यांच्या माध्यमातून सुधारणांची भावना समजून घ्या ; कृषीमंत्री तोमर म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – करोना संकटाच्या काळात आणि कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन ( farmers protest ) करणारे शेतकरी कृषी कायदे ( farm laws ) रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. पण केंद्र सरकारनेही पुन्हा एकदा आपण मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या तिन्ही कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर ( narendra singh tomar ) यांनी बुधवारी सांगितलं. तसंच तिन्ही कायद्यांच्या माध्यमातून सुधारणांची भावना समजून घ्या, असं आवानही तोमर यांनी आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांना आवाहन केलं आहे.

आंदोलन करणाऱ्या संघटना शेतकऱ्यांच्या हितावर लक्ष केंद्रीत करतील आणि विधायक चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात सरकारला मदत करतील, असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला. कृषी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्या एका गटासोबत झालेल्या बैठकीनंतर तोमर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असं तोमर म्हणाले.

‘तिन्ही कृषी कायद्यांना समर्थ देणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही भेटतोय. त्याचबरोबर या कायद्याचा विरोध करणाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. आम्ही त्यांना भेटत आहोत आणि त्यांची पत्रे आणि फोनही येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो’, असं तोमर यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. याबाबत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये बऱ्याच बैठका झाल्या. पण त्यातील चर्चेतून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *