२०२१ तंत्रज्ञान ; जुलैमध्ये सुरू होऊ शकते 5G सर्व्हिस, हे होतील बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी – वेगवेगळ्या sectors साठी 2021 कसे असेल? यावर आम्ही आपल्याला तज्ज्ञांची मते सांगत आहोत. आतापर्यंत आपण अर्थव्यवस्था, शिक्षण, नोकऱ्या, राजकारण, मनोरंजन सारख्या sectors वरील लेख वाचले आहेत. आज टेक एक्सपर्ट आणि टेक गुरु नावाने ओळखल्या जाणार्‍या अभिषेक तैलंग यांच्याकडून जाणून घेऊयात 2021 मध्ये तंत्रज्ञानाबाबत नवीन काय मिळेल…

1. 5G स्पीडचा दम दिसेल

अनेक दिवसांपासून 5G ची प्रतीक्षा होत आहे. देशात बरेच 5G सक्षम स्मार्टफोन विकले जात आहेत, परंतु 5 जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. 5 जी 2021 मध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच 5 जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे. एप्रिलपासून देशातील मेट्रो शहरांच्या निवडक मंडळांमध्येही 5 जी चाचण्या सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

या योजनेनुसार जुलै ते ऑगस्ट दरम्यान मेट्रो शहरांच्या निवडक मंडळांमध्ये 5 जी सुरू होईल. रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल कॉंग्रेस इव्हेंट दरम्यान 2021 च्या उत्तरार्धात 5 जी सेवा सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे. 5G आल्यानंतर सर्वाधिक फायद डिजिटल कंटेंटला होईल. वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रांनाही 5G चा लाभ मिळण्यास प्रारंभ होईल.

5G आल्यानंतर इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. 4G च्या तुलनेत 5G ची डाउनलोड स्पीड 10 ते 12 पटीने वाढेल. सध्या भारतात जास्तीत जास्त 4G डाउनलोड स्पीड 33.3 Mbps आहे. त्याउलट 5G डाउनलोड स्पीड 200 Mbps ते 370 Mbps पर्यंत असेल. सध्या 5G स्पीडच्या बाबतीत सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया अव्वल स्थानी आहेत.

2. मोबाइल खेळाचे मैदान होईल

पब मोबाइल फक्त एक झांकी होती, ई-स्पोर्ट्सचा पूर्ण जलवा अद्याप येणे बाकी आहे. भारत गेमिंग विश्वासाठी मोठी बाजारपेठ आहे आणि 2020 मध्ये लॉकडाउन दरम्यान याची खरी ताकद लोकांना पाहण्यास मिळाली. पबजी सारख्या गेमच्या डाउनलोड आणि अॅक्टीव्ह यूजर्सची संख्या जवळपास चौपट झाली आहे.

पबजी मोबाइलवर सरकारने बंदी घातली आहे, परंतु कंपन्या त्याच्या परतीसाठी भारतीय गेमिंग उद्योगात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार आहेत. पबजी व्यतिरिक्त, फौजी सारखे खेळ भारतीय गेमिंग उद्योगाला चालना देतील. यासोबतच रिलायन्स जिओ, एअरटेल, पेटीएम यांसारख्या कंपन्या देखील ई-स्पोर्ट्सच्या व्यवसायात उतरल्या आहेत.

2021 मध्ये 5 जी आल्यानंतर ई-स्पोर्ट्सचा कायापालट होईल. देशातील छोट्या शहरांतील बरेच लोक ई-स्पोर्ट्समध्येही त्यांचे भविष्य शोधू लागतील. ई-स्पोर्ट्समध्ये बर्‍याच रोजगाराच्या संधीही समोर येतील. ज्यामध्ये खेळाडु, तसेच त्याचे व्यवस्थापन व खेळाचे डिझाईन व निर्मिती करणार्‍यांसाठी बर्‍याच संधी उपलब्ध असतील.

3. आता चार्जर, इअरफोन विसरा

अॅपलने कंपनीने आयफोनसोबत चार्जर, इअरफोन देणे बंद केले आहे. आता हा ट्रेंड 2021 मध्ये इतर सर्व फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळेल. शाओमी सॅमसंगसह अनेक कंपन्यांनी आधीच या कपातीची घोषणा केली आहे. या कपातीमागे संपूर्ण स्मार्टफोन उद्योगातील ई-कचरा कमी करण्याच्या कारणाबरोबरच ‘कमाईची रणनीती’ देखील आहे.

इंडस्ट्री पूर्णपणे बिनतारी होण्याच्या मार्गावर आहे. कंपन्यांनी ग्राहकांना वायरलेस इयरबड्सची सवय तर टाकलीच आहे, आता वायरलेस चार्जर आणि वायरलेस पॉवर बँकची सवय लागावी अशी कंपनीची इच्छा आहे

4. फोल्डेबल स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात दिसतील

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी 2020 मध्ये आपआपले फोल्डिंग स्क्रीनचे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यातील बहुतेक स्मार्टफोन एकतर जुन्या क्लेम शेल डिझाइनसारखे उघडणारे आहेत किंवा एखाद्या पुस्तकासारखे स्क्रीनला फोल्ड करता येतात किंवा विचित्र ड्युअल स्क्रीनचे फोन आहेत. आता 2021 मध्ये, फोल्डिंग स्मार्टफोनमध्ये आणखी बरेच डिझाइन दिसतील. ज्यामध्ये रोलेबल स्क्रीनचे स्मार्टफोन देखील असतील.

डिझाइनच्या दृष्टीने रोलेबल स्क्रीन अधिक चांगली असेल, कारण पुस्तकासारखी फोल्ड होणार स्क्रीनमध्ये निशाण पडतात आणि फोन फोल्ड केल्यानंतर बराच जाड होतो. क्लेमशेल डिझाइनमध्ये सुरकुत्या सारखे निशाण पडण्याची भीती आहे. हे डिझाइन सुंदर तर दिसते मात्र यामध्ये फोन एखाद्या टॅबलेट कॉम्प्युटरच्या आकाराचा होत नाही.

5. कॅमेराचा व्हिडिओवर अधिक फोकस असेल

2020 पूर्वी स्मार्टफोनच्या कॅमेराचा जास्त फोकस ‘हा फोटो चांगला काढतो’ यावर होता, मात्र 2021 पासून स्मार्टफोनच्या कॅमेराचा फोकस ‘हा व्हिडिओ चांगला रेकॉर्ड करतो’ यावर असेल. याचा संकेत 2020 च्या शेवटच्या तिमाहीत लाँच झालेल्या बर्‍याच स्मार्टफोनमध्ये कंपन्यांनी इशाऱ्यांमध्ये दिला होता.

आयफोन 12 सिरीजमध्ये डॉल्बी व्हिजनवर जितके लक्ष केंद्रित केले गेले, तितकेच नोट 20 अल्ट्रामध्ये 8 K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मॅन्युअल व्हिडिओ शूटिंग मोड देखील होते. तर विवोच्या एक्स सिरीजमध्ये गिंबल सारखे स्टेबलाइज्ड व्हिडिओ आणि आय ऑटोफोकस सारखे व्हिडिओला उत्तम बनवणारे फीचर्स देऊन केले होते. 2021 मध्ये लाँच होणाऱ्या जवळपास प्रत्येक दुसर्‍या-तिसर्‍या स्मार्टफोनमध्ये आपल्याला हीच बाब लक्षात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *