राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, आजही पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे (Maharashtra Weather Alert). गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Maharashtra Weather Alert ).

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य मराराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार. तसेच, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.शनिवारी मुंबईत मध्यमस्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, 12 जानेवारीनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.

राज्यात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *