महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – कोरोना लसीकरण मोहीमेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील काही दिवसात देशभरात लसीकरण मोहीम राबविण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे.
लसीकरणांसंदर्भातील माहिती ग्रासरूटपर्यंत पोहोचावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळे लसीकरण मोहीमेच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत चर्चा करणार आहेत. लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून देशाच्या विविध भागात ड्राय रन घेतला जात आहे. अलीकडेच डीजीसीआयने कोरोना संसर्गावरील दोन लसींना मंजुरी दिली आहे.