‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी गुजरात – मध्य प्रदेशातील कोंबड्यांबर बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा ( bird flu) धोका पसरला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे. देशातील आठ राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला.

महाराष्ट्रातही काही मरून पडलेले पक्षी आढळले होते. मात्र चाचणीअंती त्यांना बर्ड फ्लू झाला नसल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोखण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोंबडय़ांची आवक थांबवण्यात (Gujarat-Madhya Pradesh hens banned for bird flu) आल्याची माहिती पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली.

महाराष्ट्राला तूर्तास बर्ड फ्लूचा धोका नाही. मात्र परराज्यातून संसर्ग होऊ नये यासाठी सीमेवर तपासणी नाक्यांवर अधिक दक्षता बाळगण्यात येतेय. शिवाय पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *