महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ जानेवारी – भारतीय लष्करासाठी नवनवीन शस्त्रे, तंत्रज्ञान ‘डीआरडीओ’कडून विकसित केले जाते. बरेचदा लष्करातील जवान, अधिकारी वैयक्तिक पातळीवरही अशा स्वरूपातील एखादी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतात. एका मेजरने असेच दिव्य केले आहे!
या मेजरने विकसित केलेले एक बचावाचे उपकरण भारतीय सैन्यातील नावीन्याच्या ध्यासात एक मानाचा तुरा ठरले आहे. लष्करातील मेजर अनुप मिश्रा यांनी जगातील पहिलेवहिले युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. या स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेटला ‘शक्ती’ हे नाव देण्यात आले आहे. या जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ते महिला आणि पुरुष असे दोघे परिधान करू शकतात. किंबहुना, म्हणूनच त्याला युनिव्हर्सल जॅकेट म्हटले गेले आहे. इतर जॅकेटपेक्षा या अर्थाने हे वेगळेही ठरते. हे जॅकेट जगातील पहिलेच ‘फ्लेक्सिबल बॉडी आर्मर’ही ठरले आहे.
भारतीय लष्कराशी संबंधित आणखी एक वृत्त असून, सीमेवरील पहारा अधिक नेमकेपणाने व्हावा म्हणून स्विच ड्रोन खरेदीच्या एका प्रस्तावावर सह्या झाल्या आहेत. ‘व्हर्टिकल उड्डाण’ घेणे आणि जमिनीवर हेलिकॉप्टरप्रमाणे उतरणारे हे ड्रोन कमाल 4 हजार 500 मीटर उंचीवर 2 तासांपर्यंत सलग उडू शकतील.