मानीव अभी हस्तांतरणसाठी मार्गदर्शन व चर्चा सत्र उत्साहात, सहकार आयुक्त मा. अनिल कवडे यांचे मार्गदर्शन

Spread the love

महाराष्ट्र 24 । चिंचवड । विशेष प्रतिनिधी। सोसायटीची नोंदणी झाल्यावर 4 महीन्याच्या आत बिल्डर ने Conveyance Deed कन्व्हेअन्स डीड (अभी हस्तांतरण) करून द्यायचे असते. सदर बिल्डर ने कन्व्हेअनस डीड करून दिले नसेल तर सोसायटी धारकांवर अन्याय होऊ नये म्हणून Deemed Conveyances मानीव अभी हस्तांतरण करण्यासाठी राज्य सरकार ने सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सह. संस्था या कार्यालया कडे हि जबाबदारी सोपवली आहे. सोसायटीच्या जागेच्या मालकी हक्क बद्दल सोसायटी धारकांमधये जागृती निर्माण व्हावी म्हणून सहकार निबंधकांकडून असे चर्चा सत्र घडवून मार्गदर्शन करण्यात येत आहे . डिमड कन्व्हेयन्स च्या निमित्ताने का असेना सोसायटीत सर्व सभासदांनी एकत्र येऊन मतभेद व सोसायटीतल वाद विसरून आनंदी वातावरण निर्माण करून आदर्शगाव सारखेच आदर्श सोसायटी घडवाव्यात असा संदेश आयुक्तांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता रामकृष्ण प्रेक्षागृह, चिंचवड येथे राज्य सरकारच्या सहकार विभागाच्यावतीने सोसायटीच्या जागेच्या मालकी हक्क वर्ग होण्या संबंधित डीमेड कन्व्हेअन्स (मानीव अभी हस्तांतरण) संधर्भात मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चासत्राचे उदघाटन पुण्याचे सहकार आयुक्त मा. अनिल कवडे यांच्या हस्ते झाले यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.

यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकारी एन. व्ही. आघाव, उपनिबंधक शाहूराज हिरे, तेजस्विनी मॅडम, अँड. अंजली कलंत्रे मॅडम व इतर शासकीय अधीकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच चर्चा सत्रात शहरातील सोसायटीधारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. …..

गृहनिर्माण संस्था, मानीव हस्तांतरणाचे महत्व, शासकीय तरतूदी, जुन्या गृहनिर्माण संस्थाचे पुनर्विकासासाठी येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, कन्व्हेयन्स डिड संबधीत अडचणी, सोसायटीच्या जागेच्या मालकी हक्कांबाबत सोसायटी धारक, बिल्डर व जागामालक यांच्यातील अडचणी व त्यासाठी डिमेड कन्व्हेयन्स (मानीव अभी हस्तांतरण)चे महत्व इत्यादींबद्दल वरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. व सोसायटी धारकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे दिलीत.

सदर चर्चासत्र घडवून आणल्याबद्दल व प्रश्नांवर उत्तरे व अडचणींवर मार्ग मिळाल्याबद्दल नागरीकांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. जागा मालक, बिल्डरने कन्व्हेयन्स डिड करून दिले नाही तर डायरेक्ट सहकार संस्थेचे उपनिबंधकांकडे डिमेड कन्व्हेयन्ससाठी अर्ज करता येतो. व शासकीय नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केली तर सोसायटीच्या जागेवर सोसायटीधारकांना हक्क मिळवता येतो, असे एकंदरीत चर्चा सत्रातून निष्पन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *