महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी – युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत दोन गड्याच्या मोबदल्यात १३८ धावा केल्या आहे. अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी रोहित शर्माला कमिन्सनं टिम पेनकरवी झेलबाद केलं. रोहित शर्मा सात धावांवर बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सामन्याची सुत्रं शुबमन गिलनं आपल्या हाती घेतली. अनुभवी चेतेश्वर पुजारानं संयमी फलंदाजी करत शुबमन गिलला चांगली साथ दिली आहे.
पुजारा आणि गिल या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला . शुबमन गिलनं कारकिर्दीतील आपलं दुसरं आर्धशतक झळकावलं. पुजारानं १३५ चेंडूचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलंच दमवलं आहे. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलनं १४६ चेंडूचा सामना करताना ९१ धावा केल्या. गिलनं आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये दोन खणखणीत षटकार आणि आठ चौकार लगावलेत. पहिल्या सत्रात भारतीय संघानं रोहित शर्माची विकेट गमावली. तर दुसऱ्या सत्रात गिलची आता रहाणे ६ धावांवर आणि पुजारा २६ धावांवर आहे भारतीय संघानं पहिल्या सत्रात ५० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १३८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी अद्याप १९० धावांनी गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला ८ विकेटची गरज आहे.