देशभरातील शिल्पकारांना मोठी भेट देणार टाटा, या ऍपवरून कमावण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१. जानेवारी – टाटा ट्रस्ट (TATA Trust) देशभरातील शिल्पकारांना मोठी भेट देणार आहे. संस्था आपल्या ‘अंतरण’ या उपक्रमाअंतर्गत मोबाईल ऍप आणि वेबसाईट – Craft Xchange लॉन्च करणार आहे. या ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक रिटेलर्स, डिझायनर्स आणि बुटिक चालवणारे देशभरातील शिल्पकार, विणकर, कारागिरांकडून थेट वस्तूंची खरेदी करु शकणार आहेत. त्यामुळे या शिल्पकारांना आपल्या वस्तूंची विक्री करणे सोपे जाणार आहे.टाटा ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘ शिल्पकार आणि त्यांच्या वस्तू खरेदी करण्यात पारदर्शकता यावी यासाठी आम्ही हे ऍप लॉन्च करत आहोत. तसंच ते सहजपणे एकमेकांशी संपर्क करु शकतील. सध्या कारागिर आणि खरेदीदार यांना एकमेकांशी संपर्क करण्यात अनेक अडथळे येतात. आमचे ऍप लॉन्च झाल्यानंतर हे अडथळे दूर होतील.’

देशभरातील शिल्पकार आपले डिझान या ऍपवर शेअर करु शकतील जेणेकरुन खरेदीदारांना वस्तू पाहता येतील. जर एखाद्या ग्राहकाला आपल्या पद्धतीने डिझाइन तयार करायचं असेल तर तो या अॅपच्या माध्यमातून शिल्पकारांशी संपर्क साधू शकेल. त्यानंतर ग्राहक या शिल्पकारांकडून ती वस्तू खरेदी करुन डिलिव्हरी मिळवू शकतो.ऑर्डर मिळाल्यानंतर शिल्पकार प्रॉडक्शन स्टेज सायकलबाबतची माहिती अपडेट करु शकतो. यातून ग्राहकाला हे कळेल की त्यांच्याकडून तयार केली जाणारी वस्तू कोणत्या टप्प्यात आहे आणि त्यांना कधी डिलिव्हरी मिळणार आहे. शिल्पकाराला इनव्हॉइस तयार करुन थेट आपली वस्तू पाठवून देण्याची सुविधा या ऍपमध्ये दिली आहे. टाटा ट्रस्टची अंतरण टीम देखील या अॅपद्वारे शिल्पकार आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थीचे काम करणार आहे.

टाटा ट्रस्टने सांगितले की, ‘ऍपसध्या बीटा फेजमध्ये आहे आणि शिल्पकार पायलट प्रोजेक्ट म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी नल्ली सिल्क, तनेरिया, रिलायन्स स्वदेशी, रेमंड यांच्यासोबत काम केले आहे. टाटाच्या या ऍपला अँड्रॉइड आणि IOS प्लॅटफॉर्मवर लाँच केलं जाणार आहे.’
दरम्यान, टाटा ट्रस्ट आपल्या ‘अंतरण’ उपक्रमाअंतर्गत या शिल्पकारांना प्रशिक्षण आणि कुशल करण्यासाठी काम करत आहे. या उपक्रमांतर्गत या शिल्पकारांना उद्योजक होण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे. अंतरण उपक्रमांतर्गत टाटा ट्रस्ट ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश आणि नागालँड यासारख्या 6 क्लस्टर्ससोबत काम करत आहे. जेणेकरुन या ठिकाणच्या स्थानिक हस्तकलेची जाहिरात केली जाऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *