शिवजयंती साधेपणाने साजरी करा : अजित पवार यांचे जनतेला आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२. जानेवारी – कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने आपल्या सर्वांना सण आणि उत्सव साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती ही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar has appealed that Shiv Jayanti should be celebrated in a simple manner)

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत खा‌. डॉ. अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण आणि उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळेस ही तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: यादिवशी अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्यचे त्यांनी सांगितले. तसेच शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या. यासाठी तेथील पुरातत्व विभाग, वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी घेण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *