Poco च्या स्वस्त स्मार्टफोनचा भारतात चांगला खप , विक्रीचा आकडा 10 लाखांपार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ जानेवारी – पोको (Poco) कंपनीचा Poco C3 या स्मार्टफोनला भारतात चांगली मागणी आहे. कारण आतापर्यंत भारतात 10 लाखांपेक्षा जास्त Poco C3 स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. कंपनीकडून गुरूवारी ट्विटरद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. पोको इंडिया कंपनीने Poco C3 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच केला होता. हा फोन कंपनीच्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सपैकी एक आहे. भारतीय बाजारात पोकोच्या या बजेट स्मार्टफोनची टक्कर रिअलमी सी 11, इन्फीनिक्स स्मार्ट 4 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एम 01 यांसारख्या फोन्ससोबत आहे.

पोको सी 3 स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉचसोबत 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा फोन आर्क्टिक ब्लू, लाइम ग्रीन आणि मॅट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये मिळतो. पोकोचा हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 12 वर कार्यरत असतो. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसरचा सपोर्ट असून 4GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा पर्याय आहे, याद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 512GB पर्यंत वाढवता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *