Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली; ‘मेड इन इंडिया’ FAU-G येथून कराल डाउनलोड - Maharashtra 24

ऑनलाईन गेम खेळणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली; ‘मेड इन इंडिया’ FAU-G येथून कराल डाउनलोड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. 26 जानेवारी – भारतातील ऑनलाईन गेम खेळणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली असून आज मेड इन इंडिया मल्टी-प्लेअर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच करण्यात आला आहे. हा गेम आजपासून प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून हा गेम अँड्रॉइड युजर्स तिथून डाउनलोड करु शकतात. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाल्यानंतर FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. हा गेम आता अखेर उपलब्ध झाला आहे. हा गेम nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने डेव्हलप केला असून गेमला अभिनेता अक्षय कुमार प्रमोट करत आहे. ट्विटरद्वारे FAU-G लाँच झाल्याची माहिती अक्षयने देखील दिली आहे.

भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम असेल हे समोर आले होते . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झाले आहे. FAU-G कमांडो गेममधील खेळाडूंना म्हटले जाईल, ही तुकडी धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची असेल.

लाँचिंगआधीच भारतीय युजर्समध्ये FAU-G हा गेम लोकप्रिय ठरला आहे. या गेमने लाँचिंगआधीच गुगल प्ले स्टोअरवर जवळपास 50 लाखांहून जास्त प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केल्याची माहिती nCore गेम्सकडून देण्यात आली आहे. बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हा गेम डेव्हलप केला आहे. 25 ऑक्टोबर रोजी गेमचा पहिला टीझर आला होता, गेम त्याच महिन्यात लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *