महाराष्ट्र 24 । चिंचवड । विशेष प्रतिनिधी – सन 2020 मध्ये संपूर्ण देशभरासह पिंपरी-चिंचवड शहराला कोविड-19 च्या कोरोना विषाणू या जागतिक महामारीने ग्रासले. सर्व सामाजिक घटक या कठीण काळातून गेला. सामाजिक जागरूकता बाळगत सर्वजणांनी घरात राहण्यास प्राधान्य दिले. परंतु, अशा या भयंकर जीवघेण्या महामारीतही, आपल्या जीवाची, आरोग्याची पर्वा न करता, समाजसेवेला, देशसेवेला प्रथम प्राधान्य देत, तसेच सार्वजनिक आरोग्याला महत्व देत नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी निरंतर अहोरात्र सेवा दिली. अशा 250 कोविड योध्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव सोहळा आमदार अण्णा बनसोडे आणि सिद्धार्थ फाउंडेशनच्यावतीने चिंचवड स्टेशन येथील कै. गंगाराम बहिरवडे प्राथमिक विद्यालयात उत्साहात पार पडला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सिद्धार्थ बनसोडे म्हणाले की, कोरोनासारख्या जागतीक महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेला सेवा करणाऱ्या या योध्यांचा सेवाभावी कार्याचा गौरव व्हायला हवा, ही यामागील भावना होती. त्यांचा उचित सन्मान सोहळा आयोजित करून आम्ही त्यांच्याप्रति कृतज्ञतेची भावना जोपासली. याचे आम्हाला निश्चितच समाधान होत आहे.
सदर सोहळ्याचे आयोजन सिद्धार्थ बनसोडे यांनी केले. यावेळी मा. नगरसेवक प्रसाद शेट्टी, नगरसेवक शैलेश मोरे, अतिष बारणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर विशाल काळभोर, अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिं. चिं. शहर कु. वर्षा जगताप, अध्यक्षा सामाजिक न्यायविभाग राष्ट्रवादी कॅंाग्रेस पिं.चिं.शहर गंगाताई धेंडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॅंाग्रेस पिं.चिं.शहर प्रसाद कोलते पाटील, अध्यक्षा महिला बचतग़ट राष्ट्रवादी काँग्रस पिं. चिं. शहर कविता खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
