‘इंडिया डेव्हलपमेंट सेंटर’ ; Microsoft चं अलिशान ऑफिस, कंपनीने नोएडात सुरू केलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २९- जगातील आघाडीची टेक कंपनी Microsoft ने भारतात आपलं नवीन अलिशान ऑफिस सुरू केलं आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआरच्या नोएडामध्ये नवीन इंडिया डेव्हलपमेंट सेंटर(IDC) सुरू केलं आहे. जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’पेक्षा हे ऑफिस कमी नाहीये, कारण ताजमहलच्या प्रेरणेतूनच कार्यालयाची ही इमारत उभारण्यात आली आहे.

नोएडामध्ये सुरू झालेलं इंडिया डेव्हलपमेंट सेंटर Microsoft चं भारतातील तिसरं रिसर्च सेंटर आहे. बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये कंपनीचे दोन रिसर्च सेंटर आधीपासूनच आहेत. नोएडाच्या सेंटरची खासियत म्हणजे ताजमहलच्या धर्तीवर या ऑफिसचं डिझाइन आहे. या ऑफिसमध्ये ताजमहालचा एक सुंदर मोठा फोटोही लावण्यात आला आहे.

या सेंटरमध्ये डिजिटल इनोव्हेशनसाठी प्रोडक्ट आणि सर्व्हिस क्षेत्रामध्ये काम होईल. बिजनेस आणि प्रोडक्टिविटी टूल्स, आर्टिफीशिअल इंटेलिजन्स, क्लाउड आणि एंटरप्राइज आणि नवीन गेमिंग डिव्हिजनवरही या सेंटरमध्ये जोर देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. शिवाय इथे स्थानिक तरुणांना जास्त संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. IT इंडस्ट्रीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हे ऑफिस बनवण्यात आल्याचं Microsoft India चे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव कुमार यांनी सांगितलं. या नवीन ऑफिसचे फोटो आणि व्हिडिओ कंपनीने ट्विटरद्वारे शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *