1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू ;लोकलची वेळ पाळली नाही तर होणार कठोर शिक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। मुंबई । अखेर अनेक महिन्यांनंतर सर्व सामान्य जनतेसाठी लोकल सेवा चालू होणार आहे. मुंबईकरांची लाईफलाईन पुन्हा सर्वांसाठी रूळावर येत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून दिलासा देणारी बाब देखील आहे. कोरोना महामारीनंतर अखेर लोकल सुरू होणार आहे. सर्व प्रथम लोकल आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यांनतर महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळाली. आता 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू होणार आहे. मात्र रेल्वेने लोकलने प्रवास करण्यासाठी काही वेळा ठरवून दिल्या आहे.

राज्य सरकार आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळून अन्य वेळेत प्रवास केला तर त्या प्रवाश्यांना कठोर शिक्षा होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि रेल्वे कायदा यानुसार त्या प्रवाश्यांवर कारवाई होईल. असं स्पष्टीकरण मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केलं.
त्यामुळे सामान्य जनतेला लोकलने प्रवास करताना वेळ पाळणं बंधणकारक आहे. राज्य सरकार आणि रेल्वेने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला पण आता सरकारवर अधिक ताण पडणार आहे. गर्दी टाळण्यासाठी ठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांवर सुरक्षा सुरक्षा पुरवण्यासाठी 2000 होमगार्ड आणि 650 सुरक्षा पुरवण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात रेल्वे पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. शिवाय कोणतीही अडचण अल्यास प्रवासी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क प्रवासी साधू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *