वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय ; पुण्यात वीजबिलांची थकबाकी 1 हजार कोटींवर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३० । पुणे ।वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर एकीकडे टीका होत असताना कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी तब्बल 803 कोटींनी वाढली असून ती 1 हजार कोटींच्या घरात गेली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या वीजबिलांची थकबाकी 1081 कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महसुली तुटीमध्ये वाढ होत असल्यामुळे आता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. (In Pune pending power bills has increased upto 1 crore Mahavitaran will cut connection)

महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जाणार
एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे त्याची आर्थिक झळ महावितरणला सोसावी लागत आहे. तसेच, वीजबिल थकल्यामुळे हा आर्थिक बोजा राज्य सरकारला वाहावा लागत असल्यामुळे सरकारने थकित विजबिलाच्या बाबतीत कडक पवित्रा धारण केल्याचे दिसते आहे. यानंतर जिल्ह्यातील थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून वीजबिल भरण्याचे सांगितले जाईल. तरीदेखील ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरकारने वाढीव वीजबिल माफ करावे अशी मागणी भाजपने सरकारकडे केलीये. जेवढी वीज वापरली तेवढे बील देणार, जी वीज वापरलीच नाही, ते वीजबिल देणार नाही, अशी भूमिका विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर महावितरणच्या विजपुरवठा खंडित करण्याच्या भूमिकेवर विरोधक आणि ग्राहक काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *