महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० जानेवारी – नवी दिल्ली : कोविड -19 विरुद्ध देशभरात सर्वात मोठी लसीकरण मोहीम आयोजित केली जात आहे. कोरोना लसीकरण दरम्यान, 31 जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. यापूर्वी याची सुरूवात 17 जानेवारीपासून होणार होती. परंतु, 16 जानेवारीपासून कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे याला स्थगिती देण्यात आली होती.राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनी 30 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात करणार आहेत. पोलिओ मोहिमेशी संबंधित काही तथ्य आहेत जे सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.
ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार
या मोहिमेअंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ थेंब देण्यात येणार असून ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पोलिओ निर्मुलनाच्या पुढाकारानंतर 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. पोलिओ लसीकरण मोहीम ज्या रविवारी सुरु झाली त्याला राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखले जाते.
ज्येष्ठ नागरिकांना मुलांसोबत जाण्याचा सल्ला
पोलिओ लसीकरण मोहीम वर्षातून दोनदा घेतली जाते आणि सहसा सुरुवातीच्या काही महिन्यांत सुरू केली जाते. सध्या कोविड 19 साथीच्या आजारात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना मुलांना लसीकरण शिबिरात घेऊन न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.