महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१। नवीदिल्ली । उत्तर भारतात तापमानात 2-4 अंश घट , पर्वतांवर आणखी हिमवर्षाव होणार असल्याने देशातील मैदानी प्रदेशात पुढील दोन आठवडे थंडी राहील. जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्यातील तिसरे विक्षोभ (पश्चिम देशांकडून येणाऱ्या हवेचा दाब) रविवारी सायंकाळपर्यंत येईल आणि ३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण हिमालय परिसरातील राज्यांतील उंच भागात अनेक ठिकाणी हलका व मध्यम पाऊस तसेच हिमवर्षाव होईल.
सामान्यत: डोंगरावर पश्चिमी विक्षोभ येताच उत्तरेकडील मैदानी राज्यातील वारा बदलतो व थंडी काहीशी कमी होते. मात्र, या वेळी ते कमकुवत असल्याने पुढील तीन ते चार दिवस मैदानी राज्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, मप्र, छत्तीसगड, बिहार व गुजरातमध्ये थंडी कायम राहील. पुढील तीन दिवस पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, बिहार व पश्चिम बंगालमध्ये दाट धुकेही राहील. पूर्व यूपी, बिहार व मप्रमध्ये थंडी राहील. उत्तराखंडातील गढवाल व कुमाऊच्या डोंगरांवरही हिमवर्षाव होईल. संपूर्ण उत्तर भारतात पुढील दोन आठवडे किमान तापमान २ ते १० अंशांदरम्यान असेल, जे सामान्यपेक्षा २ ते ४ अंश सेल्सियस कमी असेल.
२०२१ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंत ७ थंड दिवस होते. त्या काळात किमान तापमान ४ अंश किंवा त्यापेक्षा कमी नोंद झाले. याआधी २०१३ मध्ये ६ थंड दिवस नोंद झाले होते आणि जानेवारीत सर्वाधिक ९ थंड दिवस २००८ मध्ये नोंदवले गेले होते.
इकडे १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच जानेवारीत सिमल्याच्या डोंगरांवर हिमवर्षाव झाला नाही. हवामान केंद्राचे संचालक मनमोहनसिंह यांनी सांगितले, पुढील आठवड्यापर्यंत पाऊस व हिमवर्षावाची शक्यता नाही. मात्र, हिमाचलच्या काल्पा या उंच भागात या महिन्यात सुमारे साडेतीन फूट तर केलांगमध्ये २ फूट हिमवर्षाव झाला. डिसेंबरमध्ये सिमल्यात दोनदा हिमवर्षाव झाला. जानेवारीत ज्या ज्या वेळी पश्चिम विक्षोभ आला त्याचा परिणाम उंच भागातच झाला, मात्र तो सखल भागांत पोहोचला नाही.