महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१। मुंबई । आज सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला.सलग पाच दिवस कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे तूर्त ग्राहकांना दिला मिळाला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती.
आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८० रुपयांवर स्थिर आहे. एक लीटर डिझेल ८३.३० रुपयांना मिळत आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.