दिव्यांगना आत्मनिर्भर करण्यासाठी उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना ; अध्यक्ष आनंद बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२। पिंपरी चिंचवड । वीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे उडान दिव्यांग फाउंडेशनचे उदघाटन मा.उपमहापौर श्री तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री संभाजी येवले समाज विकास अधिकारी सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश श्रीवास, शेखर काटे , श्री दिपक भोजने प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले उपाध्यक्ष रवींद्र वाकचौरे उपस्थितीत होते श्री तुषार हिंगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले महानगरपालिका समाज विकास अधिकारी श्री संभाजी येवले यांनी मनोगतात पालिके तर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली व पालिका लवकरच अपंग भवन उभारणार आहे प्रस्तावना करताना संघटनेचे अध्यक्ष श्री आनंद बनसोडे म्हणाले की फाउंडेशनचा मुख्य उद्देश दिव्यांगना आत्मनिर्भर करणे त्याकरिता उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना केली.

कोरोना काळात तुषार हिंगे माजी उपमहापौर यांनी केलेल्या कार्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांगा मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांगांना काट्या कुबड्या चे वाटप सनी टायझर चे वाटप केले श्री दिपक भोजने , रविंद्र वाकचौरे, विनोद चांदमारे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव बाळासाहेब तरस, रवी भिसे, योगेश सोनार , हरेश्वर गाडेकर , मोहम्मद शफी पटेल , शिवाजी पवार यांनी केले उत्कृष्ट सुत्रसंचालन करून श्री भूषण इंगळे यांनी सर्वाची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *