केंद्रीय अर्थसंकल्प 2021 ची ठराविक मुद्दे…..पि.के.महाजन..जेष्ठ कर सल्लागार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२। पिंपरी चिंचवड । केंद्रीय अर्थसंकल्प 2021 ची ठराविक मुद्दे… परताव्याची आयकर तपासणीत 50 लाखा पर्यंत कर बुडवल्याची खात्री झाली तर आयकर विभागाला त्या आधारे मागील 10 वर्षाची रेकाॅरडची तपासणी करता येणार आहे.

# रिअसेसमेंट ची मर्यादा 6 वर्षांवरून 3 वर्ष करण्यात आली आहे.# आयकर दराचे पत्रक मागील वर्षां प्रमाणे आहे तसेच राहणार.

# बॅंकांचे खाजगीकरणा चे सुतोवाच देवून बँकांच्या खाजगीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.

# स्टील वरील कस्टम ड्युटी 12.5% वरून 7.5% कमी केल्या मुळे स्टील स्वस्त होणार परीणामी मरगळलेले ऑटो व बांधकाम क्षेत्रास दिलासा. तसेच नायलॉन वरील कस्टम ड्युटी 5% वर

# 75 वर्षांवरील पेन्शनधारक व व्याजापासून उत्पन्न मिळणाऱ्यां सिनीयर सिटीझनांना आयकर रिटर्न भरण्याची गरज नाही. बॅंका टि.डी.एस. ची वजावट करून कर भरतील. मात्र व्याज व पेन्शन सोडून इतर उत्पन्न असेल तर आयकर रिटर्न दाखल करावे लागेल.

# कामगारांचा पि.एफ.चा भरणा देय तारखेनंतर उशीराने केला तरी दंड आकारला जाणार नाही.

# परवडणारया घराची खरेदी करणारयांसाठी 31.03.2022 पर्यंत घर कर्ज घेतले तरी आर्थिक वर्ष 2021-22 च्या उत्पन्नातून मिळणार 1.5 लाखाची पर्यंत ची सूट.

# 95% पेक्षा जास्त व्यवहार डिजीटल मध्ये करणाऱ्या उद्योजकां साठी टॅक्स ऑडीट ची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटींवर नेण्यात आली आहे.

# आयकरा चे सर्व व्यवहार डिजीटल मध्ये करण्यासाठी आयकर लवादच्या सर्व पूर्तता डिजीटल मध्ये करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्या साठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *