महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। मुंबई। अवघ्या 10 वर्षांच्या कार्तिक भरत मोरे या चिमुरड्याने आतापर्यंत 40 किल्ले सर केले आहे. त्याच्या या पराक्रमाचं मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी कार्तिकचं तोंड भरून कौतुक केलं.मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणारा दहा वर्षांचा कार्तिक भरत मोरे. तो अवघ्या तीन वर्षाचा होता तेव्हापासून त्यांने गड किल्ले सर करायला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत त्याने पाच दहा नाही तर तब्बल 40 किल्ले सर केले आहेत. महाराष्ट्राच्या दर्याखोर्यात असलेले हे किल्ले कार्तिकच्या चिमुकल्या पावलांनी सर केलेले आहेत.
कार्तिकचे बाबा भरत मोरे यांना आधीपासूनच गिर्यारोहणाची आवड होती. आवड करा पूर्ण करण्यासाठी त्यांना फार लांब कुठे जावे लागले नाही. कारण, महाराजांच्या पुण्याईमुळे महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत आणि ते सर करण्याची उर्मी देणारे सुद्धा आहेत. कार्तिक अवघ्या तीन वर्षांच्या असताना भरत मोरे त्याला सोबत घेऊन किल्ले सर करण्यासाठी जाऊ लागले. ज्या वयात लहान मुलं चांगल्या ठिकाणी सुद्धा धडपडतात त्या वयात कार्तिक ना थेट गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि दहा वर्षाच्या होईपर्यंत 40 किल्ले आणि 10 सुळके त्याने सर केलेले आहेत.
वजीर हा सुळका आणि कोकण कडा हा किल्ला चढाईसाठी अतिशय कठीण असे आहेत परंतु, कार्तिक आणि भरत या बापलेकांनी मिळून ते सर केलेले आहेत. भरत मोरे हे रिक्षाचालक आहेत, आपल्या मुलांना म्हणजे कार्तिकने माऊंट एव्हरेस्टची चढाई करावी आणि क्लाइंबिंग या खेळ प्रकारात ऑलम्पिकमध्ये कामगिरी करावी, असं त्यांचं स्वप्न आहे.