महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। पुणे । अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात वापरला गेला. Cambridge Analytica प्रकरणी फेसबुक वापरकर्त्यांच्या डेटामध्ये गोंधळ झाला.तुम्हाला माहिती नसेल, परंतु आपल्या मोबाइल फोनमध्ये off-Facebook activity-tracking feature एक्टिवेट आहे. याच्या मदतीने मोबाइल फोनमध्ये असलेल्या वेबसाइट्स आणि इतर अॅप्सचे परीक्षण करते.
कोणती माहिती घेतो फेसबुक ?
फेसबुक तुमच्या मोबाइल फोन आणि डेस्कटॉप वरून बरीच महत्त्वपूर्ण माहिती घेतो. उदाहरणार्थ, इतर ऍप्सवरून खरेदी केलेल्या वस्तूंचा तपशील, कार्टमधील वस्तू आणि शोधल्या जाणार्या डेटाचा तपशील घेतला जातो. या व्यतिरिक्त, तुमचे Contacts, जाहिराती आणि लोकेशनपर्यंतचा डेटा देखील घेतला जातो. फेसबुकला तुमच्या घराचा पत्ता देखील माहित आहे.
Online Tracking थांबवण्याची पद्धत
प्रथम फेसबुक अॅप उघडा. आता येथे Option Menu वर जा. येथे Settings and Privacy पर्यायावर क्लिक करा. आता Permissions टॅब उघडा. येथे Refuse permissions for all settings सिलेक्ट करा.
आपल्या फेसबुक अॅप सेटिंग्जमधील हॅम्बर्गर (hamburger) आयकॉनवर क्लिक करा. येथे Settings and Privacy उघडा. आता off-Facebook Activity वर क्लिक करा. या व्यतिरिक्त क्लिअर हिस्ट्री चा पर्याय देखील निवडू शकता.