महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। इस्लामाबाद । चीन आपल्या बनावट वस्तूंकरिता संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. चीनमध्ये बनावट कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा करणार्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीकडून 3 हजार डोस जप्त करण्यात आले आहेत. चीनने पाकिस्तानला हीच बनावट लस दिली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
चीनकडून पाकिस्तानला किती खरे आणि किती खोटे डोस पाठविले, हे सांगणे अवघड असले; तरी या टोळीतील लोकांनी आपण ही लस परदेशात पाठवण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली आहे. चीनमधून पाकिस्तानी वायुसेनेचे विमान मोफत कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेऊन आले आहे. पाकिस्तानला चीकडून पाच लाख डोस देण्यात आले आहेत. बहुतेक प्रांतात हे लसीचे डोस पाकिस्तानने पाठवले आहेत. या घटनेला दोन दिवस उलटले तोपर्यंत चीनमध्ये बनावट लसपुरवठा करणार्या 80 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. हा बनावट लसीचा पुरवठा सप्टेंबरपासून सुरू होता.