महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। नागपूर । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काम करताना सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. ही माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या कामाद्वारे विश्वविक्रमाचीच नोंद केली गेल्याचेही गडकरी यांनी जाहीर केले आहे. (nitin gadkari sets world records)
दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करतांना २४ तासांच्या कालावधीत हे काम करण्यात आले. या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत, असे गडकरी यांनी माहिती देताना सांगितले. देशासाठी पायाभूत सुविधा आता आधीपेक्षाही अधिक वेगाने तयार करण्यात येत आहे असे सांगत आम्ही केवळ नवीन मापदंड घालून दिले नाहीत, तर जागतिक विक्रमही प्रस्थापित केला असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
Here is the glimpse of road construction under MoRTH and NHAI, which set world record in road construction on the Delhi – Vadodara – Mumbai expressway. #Infra4NewIndia#PragatiKaHighway pic.twitter.com/2YJtDwbm2g
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 3, 2021
हा महामार्ग निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये PQCचा सर्वाधिक वापर केला गेला. २४ तासांत PQCचे सर्वाधिक उत्पादन केले गेले. तसेच PQC ने २४ तासांपर्यंत सलग १८.७५ मीटर रुंद रस्त्याची निर्मिती केली गेली, असे नमूद करतानाच २४ तासांमध्ये एक्स्प्रेस वेवर PQC च्या वापराने जेवढा रस्ता तयार केला गेला, तो देखील एक विश्वविक्रम आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे हे ४ जागतिक विक्रम झाल्याचे ते म्हणाले.
In our efforts to build infrastructure for the nation faster than ever, we are not only setting new standards but also breaking world records. #Infra4NewIndia#PragatiKaHighway pic.twitter.com/LfpB0Dty1y
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 3, 2021