आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपरीतील 28 सिंधी बांधवांना मिळाले भारतीय नागरिकत्व

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.५। पुणे । जे नागरिक पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणीस्तान, पारशी ये विविध देशातून आले आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्त्व अधिनियमन 1955 नुसार भारतीय नागरीकत्त्व देण्यात येते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सिंधी समाजाने देशाच्या कानाकोपर्यात जिथे जागा मिळेल तिथे राहून देशासाठी जे योगदान दिले ते निश्चितच उल्लेखनिय आहे. देशाच्या फाळणीमध्ये आपले सर्वस्व गमावले मात्र खचून न जाता देशाच्या कानाकोपर्यात जिथे मिळेल तिथे चिकाटीने व्यवसाय उदयोग करून टिकून आहेत. आ. आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पिंपरीमधील 28 सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व मिळाले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व डब्बू आसवानी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

ह्यावेळी बोलतांना अजित पवार ह्यांनी आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक डब्बू आसवानी यांनी सातत्याने यागोष्टीसाठी पाठपुरावा केला, पिंपरी येथे सिंधी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, इतर देशातून स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजतील ज्या बांधवांकडे भारतीय नागरिकत्व नाही अशा 28 नागरिकांना भारतीय नागरिकत्व यावेळी देण्यात आले. येथील व्यापार उद्योग वाढवण्यास सिंधी समाजाने मोठा पुढाकार घेतला आहे. देशाच्या फाळणीमध्ये आपले सर्वस्व गमावले परंतु, खचून न जाता देशाच्या कानाकोपर्यात जिथे मिळेल तिथे चिकाटीने हा समाज उद्योग-व्यवसायात टिकून आहेत. या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा समाज जिथे राहणार तिथलाच होऊन जातो. सामाजिक कार्यात ही पुढाकार घेणारा असा हा सिंधी समाज आहे.

भारत मंत्रालयाद्वारे भारतीय नागरिकत्व 1955 ने नागरिकत्व देण्याचा जो काही निर्णय झाला. यात बरेच जण पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून आले त्यात शीख, हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, इसाई, आहेत यांना भारतीय नागरिकत्व देता येणार आहे. त्यामध्ये ऑनलाईनदेखील अर्ज करता येतो. पिंपरी-चिंचवड येथील आतापर्यंत जे प्रस्ताव आले. त्यातील 28 जणांना आज देण्यात आले उर्वरित 35 जणांना लवकरच देण्यात येणार आहेत, असे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *