मनसेत येण्याची राज ठाकरेंची खुली ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.6। पुणे । ”ज्यांना कोणाला पक्षात यायचे आहे, त्यांना आताच दार उघडे असतील, निवडणुकीच्या तोंडावर नाही”, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) म्हणालेत. पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल आढावा बैठक घेतली होती, त्यावेळी त्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे यांनी मनसेत इनकमिंग सुरू असल्याचं मान्य केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील कोअर कमिटीसोबत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. (MNS Incoming Starts; Raj Thackeray Open Offer To Other Party Workers)

आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल 5 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या 14 जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली होती. ही बैठक जवळपास 2 तास चालली होती. यावेळी राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात अहवाल देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा देत कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत.

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती
1) उत्तर मुंबई

बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे

2) उत्तर मध्य

संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे

3) उत्तर पश्चिम

शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे

4) दक्षिण मध्य

अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे

5) दक्षिण मुंबई

नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे

6) उत्तर पूर्व

अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *