नारळाच्या पाण्याचे सेवन उत्तम आरोग्यासाठी दररोज करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.७। पुणे । आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी अश्या अनेक अन्नपदार्थांचे सेवन आपण नेमाने करीत असतो. यातील अनेक पदार्थ संपूर्ण नैसर्गिक असतात, तर काही कृत्रिम रित्या तयार केले जातात. यामध्येच एक पेय असे आहे, जे संपूर्णपणे निसर्गदत्त आहे, चविष्ट आहे, आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते, थकवा दूर होतो आणि शारीरतील पाण्याची कमतरता दूर होते. त्यामुळे इतर पेयांच्या जोडीनेच नारळाच्या पाण्याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये अवश्य करावा.

नारळाच्या पाण्यामध्ये असलेले डायटरी फायबर अन्न पचण्यास मदत करते, या फायबर मुळे भूक शमण्यास मदत मिळून त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा नाहीशी होते, परिणामी वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक मात्रेमध्ये असून, याच्या सेवनाने मायग्रेनमुळे उद्भविणारी डोकेदुखी निवळण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये क जीवनसत्व आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याच्या सेवनाने उच्चरक्तदाब नियंत्रणात राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *