टेक न्युज ; हे App तुमच्या फोनमध्ये असेल तर लगेच डिलीट करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० । नवीदिल्ली । स्मार्टफोन्स हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग तर झालाच आहे आणि दिवसेंदिवस त्याची अपरिहार्यताही वाढत आहे. त्याचं कारण म्हणजे नेहमीच्या कामाच्या अनेक गोष्टी सुलभ करण्यासाठी मदत करणारी वेगवेगळी अ‍ॅप्स. बारकोड किंवा क्यूआर कोड या गोष्टी वर्षानुवर्षं वापरल्या जात आहेत; मात्र त्या सामान्य माणसालाही इतक्या उपयुक्त ठरू शकतात, हे स्मार्टफोन्स आल्यावर आणि त्यातही कोड स्कॅन करणारी अ‍ॅप्स आल्यावर कळलं. या वेगवेगळ्या अ‍ॅप्सची उपयुक्तता तर आहेच; मात्र त्याचा गैरफायदा घेऊन काही अॅप्स सायबर सुरक्षिततेला धोकाही उत्पन्न करतात. बारकोड स्कॅनर नावाचं एक अ‍ॅप त्यापैकीच एक. LavaBird Ltd या डेव्हलपर कंपनीने तयार केलेल्या या अॅपमध्ये व्हायरस असल्याची माहिती मिळताच गुगल प्ले स्टोअरने ते अ‍ॅप हटवलं आहे.

बारकोड स्कॅनर (Barcode Scanner) हे हानिकारक अ‍ॅप तब्बल एक कोटी युझर्सच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) आहे. कारण ते अॅप्लिकेशन बरीच वर्षं गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) होतं. अनेक वर्षं ते चांगलं होतं; पण अलीकडे त्याद्वारे व्हायरस (Virus) पसरत असल्याची माहिती मालवेअरबाइट्स या सायबर सिक्युरिटी कंपनीने दिली होती.

हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर डिफॉल्ट ब्राउझरमध्ये (Browser) जाहिराती दाखवत होतं. अनेक युझर्सचं असं म्हणणं होतं, की त्यांच्या फोनच्या ब्राउझरमध्ये अचानक एक वेबसाइट उघडली जात होती आणि त्याद्वारे फोनमध्ये क्लीनर अॅप डाउनलोड करण्याची सूचना केली जात होती.

आता हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरूनच हटवण्यात आलं आहे; मात्र ज्या युझर्सनी ते डाउनलोड केलं होतं, त्यांच्यासाठी अजूनही धोका टळलेला नाही. तुम्हीही हे अ‍ॅप कधी डाउनलोड केलं असलंत, तर स्मार्टफोनवरून ते तातडीने अनइन्स्टॉल करा. ते अ‍ॅप आपल्या फोनमध्ये कुठे तरी दडून राहिलं असून, आपल्याला मिळत नाहीये, असं वाटत असेल, तर AppChecker डाउनलोड करा. त्यात Barcode Scanner असं सर्च करून ते अॅप डिलीट करा.

सिक्युरिटी फर्मचं असं म्हणणं आहे, की बारकोड स्कॅनर हे सुरुवातीला एक सर्वसाधारण, नेहमीसारखं अ‍ॅप्लिकेशन होतं; मात्र गेल्या वर्षी त्याचा एक अपडेट आल्यानंतर ते हानिकारक स्वरूपात बदललं. हा अपडेट चार डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर या अ‍ॅपने स्मार्टफोनच्या ब्राउझरमध्ये अ‍ॅडवेअर पाठवणं सुरू केलं. त्यानंतर ते घातक ठरू लागलं. त्याआधी अनेक वर्षं ते अ‍ॅप चांगलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *