पेट्रोल, डिझेलची दर वाढ चालूच ; जाणून घ्या किंमत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ । मुंबई । आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीतील वाढ झाल्याने पेट्रोल-डिझलचे दर वाढत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. आज पेट्रोलच्या दरातही 24 ते 25 पैशांची वाढ नोंदवली गेलीय. तर डिझेलच्या दरात 30 ते 31 पैशांची वाढ झालीय, दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. (Diesel Petrol Price Today On 11 February 2021 In India Know Rates According To iocl)

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नव्या उंचीवर, सलग तिसर्‍या दिवशी वाढ
गुरुवारी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्या उंचीवर पोहोचले. दोन्ही इंधनाचे दर सलग तिसर्‍या दिवशी वाढले. पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 31 पैशांची वाढ झालीय. दिल्लीत पेट्रोल 87.85 रुपये प्रतिलिटर, तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 94.36 रुपयांवर पोहोचले. त्याचबरोबर दिल्लीत आतापर्यंत डिझेलची किंमत 78.03 रुपये होती आणि मुंबईत प्रति लिटर 84.94 रुपये इतकी झालीय. यंदा आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 3.89 आणि 3.86 रुपयांनी वाढ झाली आहे.


प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 94.36 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Petrol Price Today): 93.65 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Petrol Price Today ): 93.54 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Petrol Price Today): 94 .33 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 87.85 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 88.92 रुपये
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 89.96 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 84.94 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Diesel Price Today): 82.92 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Diesel Price Today): 82.81 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Diesel Price Today): 84.91 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 78.03 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 81.31 रुपये रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) 82.90 रुपये प्रतिलिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *