महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ । चेन्नई । भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरीजचा दुसरा सामना चेन्नईमधील चेपक स्टेडियममध्ये सुरू आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या आठ विकेट पडल्या असून, 300+ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत.दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 विकेटवर 300 धावांपासून खेळणे सुरू केले होते. ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले असून, हे त्याचे कसोटीमधील सहावे अर्धशतक आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमवल्या. मोइन अलीने अक्षर पटेल आणि इशांत शर्माला आउट केले.