तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ४ गडी गमावले, पुजारानंतर रोहित पंत ही पव्हेलियनमध्ये परतला

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ ।चेन्नई । भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरिजचा दुसरा सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात ८५ धावांवर ४ गडी गमावले आहेत. भारताला २७५+ धावांची आघाडी मिळाली आहे. सध्या विराट कोहली आणि रहाणे क्रीजवर आहेत.

भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी 1 गडी बाद 54 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाने एक धाव करताना चेतेश्वर पुजारा (7) धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही जास्तवेळ टिकू शकला नाही आणि 26 धावांवर बाद झाला. जॅक लीचच्या चेंडूवर यष्टिरक्षक बेन फोक्सने त्याला यष्टीचीत केले. त्या नंतर पंत ला ८ धावांवर ळीच ने माघारी पाठवले ,शुभमन गिल (14) दुसऱ्याच दिवशी लीचचा शिकार ठरला होता.

इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावा करता आल्या

दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 329 धावा केल्या. रोहित शर्माने 161 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड टीम रोहितच्या स्कोर इतक्याही धावा करू शकली नाही. इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 195 धावांची आघाडी मिळाली.

अक्षरने कसोटी पदापर्णात रुटला बाद केले

इंग्लंडची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. इंशात शर्माने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंशातने सलामीवीर रोरी बर्न्सला शून्यावर एलबीडब्ल्यू केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षरने जो रूटला बाद केले. मागील कसोटीत द्विशतक करणारा जो रूट यावेळी केवळ 6 धावा करू शकला.

अश्विनने 5 बळी घेतले

रविचंद्रन अश्विनने ओपनर डॉम सिबली (16), डॅन लॉरेंस (9), बेन स्टोक्स (18), ओली स्टोन (1) आणि स्टुअर्ट ब्रॉड (0)ला आउट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *