१५ मिनिटं जास्त कामाचाही मिळणार ओव्हरटाइम; नव्या कामगार कायद्यात तरतूद

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ । मुंबई । कामगार मंत्रालय (Ministry of Labour) पुढच्यावर्षी आर्थिक वर्षापासून लेबर कायदा लागू करणार आहेत. सरकार याला अंतिम रुप देण्यावर कार्य करत आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर कामगार कायद्यात सुधारित नियमांचं पालन होणार आहे. यासोबतच सरकार नवीन नियम कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सरकार नव्या श्रम कायद्याच्या अंतर्गत ओवरटाइममध्ये देखील बदल होणार आहेत. १५ मिनिटे देखील जास्त काम केलं तर ओव्हरटाइम मिळणार आहे. या करता कंपनी कर्मचाऱ्यांना पैसे देणार आहे. म्हणजे कामाचे तास संपल्यानंतर पुढे १५ मिनिटे देखील अधिक काम केलं तरी कंपनी त्याचे वेगळे पैसे देणार आहेत.

या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार प्रतिक्रिया
श्रम मंत्रालयच्या ओव्हरटाइमच्या नव्या नियमावर चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. यानंतरच सर्व नियम लागू केले जाणार आहेत.

PE आणि ESI संदर्भातही नवे नियम
श्रम कायद्यानुसार कपंन्यांना सर्व कर्मचाऱ्यांचे पीएफ (PF) आणि ईएसआय (ESI) सारख्या सुविधा द्याव्या लागणार आहे. थर्ड पार्टीचं कारण देत कंपनी हा नियम टाळू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *