पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प; शहरवासियांना काय मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ । पिंपरी । येत्या गुरुवारी विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेत आयुक्त राजेश पाटील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या वर्षी महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर होणार आहे. साहजिकच अर्थसंकल्पातून नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे डोळे लागले आहे. (Pimpari Chinchwad Mahapalika Budget)पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा 39 वा अर्थसंकल्प आहे. तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. राजेश पाटील यांनी नुकतीच महापालिकेची सुत्रं हातात घेतली आहे.

दरम्यान, मागील वर्षी मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प होता.यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे आहे. या सगळ्या पार्शअवभूमीवर कोणत्या नवीन घोषणा केल्या जातात, याकडे शहरवासीयांच्या नजरा आहेत.

महापालिकेचे मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यामुळे साहजिकच अर्थसंकल्पावर त्यांची छाप असणार आहे. हर्डीकर यांच्या टीमने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील स्थायी समितीला सादर करतील.गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या बदली संदर्भात सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकपदी हर्डीकर यांची बदली झाली असून गेली पावणे चार वर्षे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले.हर्डीकर यांनी शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नियमाच्या अधिन राहून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *