महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ । नवीदिल्ली । चीनच्या लष्काराने पॅंगोंग झीलच्या उत्तर तटावरून फिंगर-४ क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रावर चीनने जे अतिक्रमण केलेले होते, तेदेखील काढण्यास सुरुवात झाली आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या सामंसज्य करारानुसार ही हालचाल सुरू झालेली आहे. या क्षेत्रात चीन मागील वर्षी अतिक्रमण केले होते. करारानुसार चीनला आपलं सैन्य फिंगर-८ म्हणजे सिरीजप चौकीपर्यंत मागे न्यावं लागणार आहे. तसेच भारताला फिंगर २-३ च्यामध्ये असणाऱ्या धनसिंह थापा चौकीपर्यंत परत यावे लागणार आहे.
धनसिंह थापा ही चौकी अनेक वर्षांपासून भारताची मुख्य चौकी राहिलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सैन्याला गस्त आणि इतर हालचाली बंद कराव्या लागणार आहेत. पॅंगोंग झीलच्या किनाऱ्यावरील पर्वत बोटांच्या आकाराचे दिसतात. त्यामुळे याला फिंगर असे संबोधले जाते. याची संख्या ८ आहे. भारत फिंगर ८ पर्यंत आपले क्षेत्र असल्याचा दावा करतो, तर चीन फिंगर ४ पर्यंत आमंच क्षेत्र असल्याचा दावा करतं. यावरून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे फिंगर ४ आणि फिंगर ८ दरम्यान असणाऱ्या भूभागात दोन्ही सैन्य कित्येक वेळा एकमेकांना भिडलेले आहेत.
सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “फिंगर ४ पर्यंत चीनने आपलं सैन्य कमी केलेलं आहे. चीनी सैन्य झीलपासून नौदलातील सैन्यही बाहेर पडत आहे. चीनने एलएसीवर पॅंगोंग झीलच्या दक्षिण भागावर आपले जवान तैनात केले होते. मागील वर्षी फिंगर ८ पर्यंत चीनने आपले सैन्य तैनात केले होते. जर का एकदा चीनी सैन्य मागे गेले तर राजकीय आणि सैन्यातील चर्चेमध्ये सहमती मिळाली तर पुन्हा एकदा गस्त सुरू होईल.”