महागाई चा विस्फोट :डाळ आणि तेलानंतर आता हळद , भाव सर्वात उच्च पातळीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ । मुंबई ।हळदीविना भारतीय जेवणाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. स्वयंपाकात रोज चिमुटभर हळदीचा वापर केला जातो. मात्र, याच्या किमती एवढ्या वेगाने वाढल्या आहेत की, चिमुटभर हळदही महाग वाटू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांदरम्यान हळदीच्या भावात तीन हजार रु. प्रतिक्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. हळदीचे भाव पाच वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात ठोक बाजारांत हळदीचा भाव ८२५० रु. प्रतिक्विंटलपर्यंत नोंदला आहे. जाणकारांनुसार, नवे पीक आल्यानंतरही हळदीच्या भावात तेजी थांबत नाही. पुरवठ्यात घट आणि मागणी वाढणे हे याचे मुख्य कारण आहे. देशात हळदीच्या प्रमुख उत्पादक राज्य तेलंगणात हळदीचे क्षेत्र घटले आहे. तेलंगणात २०१९-२० मध्ये ०.५५ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली होती.

२०२०-२१ मध्ये यामुळे खूप कमी ०.४१ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली आहे. खराब हवामानामुळे उत्पादनावर बराच परिणाम झाला आहे. गेल्या चार वर्षांत हळदीला चांगली किंमत न मिळाल्याने अनेक शेतकरी सोयाबीन आणि कापसाकडे वळले आहेत. हे शेतकरी हळदीसाठी १० हजार रु. प्रतिक्विंटल हमी भावाची मागणी करत आहेत. लॉकडाऊन खुले झाल्यानंतर हळदीच्या मागणीत तेजी आली आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे मागणी घटली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *