सतर्क रहा ; तुमच्याकडचं FASTag ‘फेक’ तर नाही ना?, ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने’ ( NHAI) ने दिली ‘वॉर्निंग’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. १७ – टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून देशभरात वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (FASTag) बंधनकारक करण्यात आले आहे. अशातच खोटे फास्टॅग विकले जात असल्याचे काही प्रकार समोर येत असून ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने'(NHAI) फास्टॅगबाबत लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

खोट्या FASTag ची विक्री :-
खोट्या FASTag पासून सतर्क राहण्याचं आवाहन NHAI ने नागरिकांना केलं आहे. “काहीजण फसवणूक करुन ऑनलाइन खोटे FASTag विकत आहेत. हे FASTag दिसायला अगदी NHAI/IHMCL च्या फास्टॅगप्रमाणेच आहेत. पण हे खोटे FASTag टोलनाक्यांवर काहीही कामाचे नाहीत, कारण त्या फास्टॅगद्वारे तुम्हाला टोलप्लाझा ओलांडून जाण्याची परवानगी मिळू शकत नाही”, असा इशारा NHAI ने दिला आहे.

फक्त इथून खरेदी करा FASTag :-
लोकांनी खरा FASTag खरेदी करण्यासाठी www.ihmcl.co.in या वेबसाइटवर क्लिक करावं किंवा MyFastag App चा वापर करावा, असंही NHAI कडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय युजर्स एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा २३ नामांकित बँकांच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध आहे.

दुप्पट टोल :-
१५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *