महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – न्यूयॉर्क – दि. १७ – टेक साईट ‘वाबेटाइन्फो’च्या नव्या रिपोर्टनुसार आता व्हॉटस् अॅपवर ‘लॉग आऊट’ हे नवे फीचर मिळणार आहे. बर्याच दिवसांपासून अशा फीचरची यूजर्स मागणी करीत होते. व्हॉटस् अॅप आपल्याबरोबर चोवीस तास अॅक्टिव्ह राहत असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत मित्र-नातेवाईक किंवा अन्य लोकांचे मेसेज येतच असतात. तरीही आपण अॅपपासून ब्रेक घेऊ शकत नाही. अॅपवर ‘डिलिट अकाऊंट’ हाच एक ऑप्शन असतो. आता त्यावर उपाय म्हणून ‘लॉग आऊट’ आणले जाणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार आता व्हॉटस् अॅपवरील ‘डिलिट अकाऊंट’ हा ऑप्शन गायब केला जाईल. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ‘व्हॉटस् अॅप’च्या बीटा व्हर्जनमध्ये नवे ‘लॉग आऊट’चा ऑप्शन आलेला आहे. काही लोकांना हे फीचर आपल्या व्हॉटस् अॅपमध्ये दिसूही लागले आहे. असे म्हटले जात आहे की नवे लॉग आऊट फीचर व्हॉटस् अॅप मेसेंजर आबि बिझनेस व्हर्जनमध्ये येईल. ते आयओएस आणि अँड्रॉईड अशा दोन्हींमध्ये अपडेट केले जाईल. लॉग आऊटमुळे यूजर्सला व्हॉटस् अॅपमधून हवा तितका वेळ ब्रेक घेता येऊ शकेल.