‘या’ तारखांना पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याकडून इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । पुणे । हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चक्क हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. अशात हवामान खात्याकडून पुणेकरांसाठीही इशारा दिला आहे.पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.(maharashtra Weather rain alert in pune from Meteorological Department heavy rain in next three days)

दरम्यान, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजे 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. (maharashtra Weather rain alert in pune from Meteorological Department heavy rain in next three days)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *