सर्वसामान्यांसाठी बाजारात कधी उपलब्ध होणार कोरोना लस? केंद्राच उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । नवीदिल्ली । भारतात सध्या कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सरकारच्या यादीत फक्त आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्यांचा समावेश आहे. ही लस (covid 19 vaccine) फक्त सरकारच देतं आहे, म्हणजे तुम्हाला जर हा वैयक्तिकरित्या ही लस घ्यायची असेल तर ती तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध नाही. मात्र आता लवकरच ही लस सर्वांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे.

सर्वसामान्यांसाठी बाजारात कोरोना लस कधी मिळणार याचं उत्तर दिलं आहे, नवी दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी. या वर्षातच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “प्राधान्यानं ज्यांना लस दिली जाते आहे, त्यांचं लसीकरण झाल्यानंतर आणि लशीच्या मागणीइतकाच पुरवठा होत असेल तेव्हा कोरोना लस बाजारात उलब्ध करून दिली जाईल. कदाचित याच वर्षाच्या अखेरला किंवा त्याआधीच हे शक्य होईल अशी आशा आहे”

भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) ही स्वदेशी कोरोना लस आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (serum institute of india) ऑक्सफोर्ड (Oxford) अॅस्ट्राझेनेकाची (AstraZenecas) कोविशिल्ड (Covishield) या दोन लशी लसीकरण मोहिमेत दिल्या जात आहे.

जूनपर्यंत 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटी 50 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनादेखील लस दिली जाण्याची शक्यता आहे. 4 आठवड्यांच्या अंतरानंतर आता लशीचा पहिला डोस घेतलेल्यांना लशीचा दुसरा डोसही दिला जातो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *