कोरोनाचा धोका : या जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वर्धा – दि. १९ – जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा (Covid-19)प्रादुर्भाव लक्षात घेत शाळा महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते 12 वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ( Schools and colleges closed again in Wardha district) मात्र, ऑनलाईन वर्ग घेण्यास मनाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज सुरू ठेवत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत शाळा राहणार बंद आहेत, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेश देताना म्हटले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शाळा आणि महाविद्यालय पुन्हा बंदचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट येथील स्पंदन वसतिगृहातील 96 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ निर्माण झाली होती. कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तसेच विद्यार्थीही सापडल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *