इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या चेन्नई सत्रात सर्वात वयोवृद्ध तर राजस्थान सर्वात तरुण संघ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. १९ – इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रात महेद्रसिंह धोनीच्या नेतृवातील चेन्नई सुपर किंग हा संघ सर्वात वयोवृद्ध संघ असून राजस्थानचा संघ सर्वात तरुण आहे. सीएसके संघातील खेळाडूंचे सरासरी वय हे 30.4 वर्षे तर राजस्थानचे 26.16 वर्षे आहे. याशिवाय, कर्णधारांमध्ये धोनीचे वय(39 वर्षे) सर्वाधिक आहे.

या लीगमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा सर्वात तरुण कर्णधार असून त्यांचे वय अवघे 26 वर्षे आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचे वय 32 वर्षे आहे. पाच वेळेस विजेतेपद व गतविजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे वय 33 वर्षे असून तो येत्या 30 एप्रिलला 34 वर्षाचा होईल.

वयोवृद्ध खेळाडू ताहिर आणि गेलला संघाने ठेवले कायम

आयपीएलच्या चौदाव्या सत्रात चेन्नईचा ताहिर हा सर्वात वयस्कर खेळाडू असून त्याचे वय 41 आहे, तो येत्या 27 मार्चला 42 वर्षाचा होईल. त्यानंतर क्रिस गेल (41 वर्षे) आणि हरभजन सिंग (40 वर्षे) यांचा नंबर येतो. ताहिरला चेन्नईने तर गेलला पंजाब संघाने कायम ठेवले आहे. दुसरीकडे, हरभजन सिंगला चेन्नई संघाने रिलीज केले होते. परंतू, लिलावी प्रक्रियेत कोलकता संघाने त्याला 2 कोटी बेस प्राइसमध्ये विकत घेतले आहे.

सीजनमध्ये 19 वर्षाचे 3 खेळाडू

या सत्रात टॉप-5 तरूण खेळाडूात राजस्थान संघाचे 3 खेळाडू असून यात यशस्वी जयस्वाल प्रथम क्रमांकवर आहे तर, रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनराईजर्स हैद्राबादाचा मुजीब उर रहमान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कलचे वय 20-20 वर्षे आहे. मुजीबला सोडून इतर चार खेळाडूंची कामगिरी मागील सत्रात चांगली होती.

लिलावात पंजाबने सर्वात जास्त खेळाडू विकत घेतले

गुरुवारी झालेल्या लिलावी प्रक्रियेत प्रिती झिंटाचा संघ पंजाबने सर्वात जास्त खेळाडू विकत घेतले. तर, दुसरीकडे कोलकता नाइटरायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी 8-8 खेळाडूवर बोली लावली. मुंबई इंडियन्सने 7, चेन्नई सुपरकिंग्सने 6 आणि सनराईज हैद्राबादने सर्वात कमी 3 खेळाडूला विकत घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *