महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। पुणे । शहरात पुन्हा कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन फैलाव थांबवण्यासाठी शहरात अनेक निर्बंध लावण्यात आहेत. मात्र, गुलटेकडी मार्केट यार्डात त्या उलट परिस्थितीत अनुभवायला मिळत आहेत. भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, फुलबाजारातील व्यापारी, खरेदीसाठी ग्राहक, कामगारांना मात्र कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनामास्क बाजारात फिरताना दिसत आहेत.
मार्केटमध्ये दररोज दररोज साधारणतः नागरिक, अडते, व्यापारी, किरकोळ खरेदीदार, कामगार यांची बाजारात येण्याची संख्या मोठी आहे. बाजारात दररोज २० ते २५ हजार लोकांची ये जा असते.
बाजारात फिरताना अनेक लोक मास्क वापरत नाहीत. अनेकांच्या तोंडला अर्धवट मास्क लावलेले असते. गेटवर सॅनिटाटझरचा वापर केला जात नाही. ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर केला जात नाही. त्यामुळे कोरोनाबाबत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून बाजार समितीसह आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डात मोठी गर्दी होते. यावर अद्याप कोणताही अंकुश नाही. तसेच समितीने नियमावली जाहीर केली असली त्यावर कोणीही अंमलबजावणी करताना दिसून येत नाही.